कोल्हापूर : अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दसरा चौकातील दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला अभ्यासभेट दिली. संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास यांनी त्यांचे स्वागत केले. अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या अभ्यासभेटीत डेन्व्हर विद्यापीठातील शिक्षक स्कॉट कॉफोरा, केव्हिन मॅडी, होलीस, रुबेका, व्हिक्टोरिया, कॅटरीन या विद्यार्थ्यांचा समावेश होता. डॉ. असिफ सौदागर यांनी मुस्लिम बोर्डिंगविषयी माहिती दिली. सानोबर चौधरी यांनी संस्था, शाळेची माहिती दिली.
शालेय समितीचे चेअरमन फारुक पटवेगार यांनी आभार मानले. जिलानी शेख यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी दुभाषी म्हणून एम. बी. बिच्चू यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक एस. एस. काझी, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, हमजेखान शिंदी, रफिक शेख, मलिक बागवान, जहॉँगीर अत्तार, अल्ताफ झाजी उपस्थित होते.