शुभम शेळके यांना तालुक्यातून मिळालेल्या पाठिंब्यानंतर आज शहरातील गल्लोगल्लीमधूनही पाठिंबा मिळाला. ज्या ज्या ठिकाणी शुभम शेळके प्रचारासाठी गेले, त्या त्या ठिकाणी शुभम शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक वाढविणारे शुभम शेळके हे अवघ्या २६ वर्षांचे आहेत; परंतु मराठी भाषिकांसाठी त्यांनी दाखविलेल्या करारी बाण्यामुळे सीमा भागातील सर्व मराठी जनता पुन्हा एकदा एकवटली आहे.
भाजपच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे दोन्ही उमेदवार जरी राजकीय वर्तुळातील असले तरी शुभम शेळके यांच्या निवडणुकीत उतरण्याने आणि त्यांच्या प्रचार सभांमुळे राष्ट्रीय पक्षांना धडकी भरली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून मराठी मतदारांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार पर्याय ठरू शकतो, असे मानले जात आहे. यामुळेच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांपुढे समितीच्या उमेदवाराचे तगडे आव्हान आहे. समितीने या निवडणुकीत युवा नेतृत्वाला संधी दिली असून निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.
फोटो; शुभम शेळके प्रचार करताना