कारखान्याने दिनांक १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गाळप केलेल्या ७० हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे बिल २१ कोटी ९ लाख ३२ हजार ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
कारखान्याने आजपर्यंत १ लाख ९२ हजार १८० मेट्रिक टन ऊस गाळप करून २ लाख १८ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के असून संचालक मंडळाने काटकसर व पारदर्शक कारभार करत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले आहे. त्यामुळे सर्वांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष आमदार पाटील व उपाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.