कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असलेल्या अकरावी प्र्रवेशाची प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होत असून, सलग २0 दिवस शहरातील ३२ महाविद्यालयांतील १३,४०० विद्यार्थी क्षमतेसाठी केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश प्रक्रिया व प्रवेश यादीची माहिती (‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल) या मोबाईल अॅपवर उपलब्ध असणार आहे. प्रक्रियेचे मुख्य केंद्र यावर्षी राजाराम महाविद्यालय राहणार आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ)या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया, महाविद्यालयांची माहिती ठेवली असल्याचे शिक्षण उपसंचालक व प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले. शाळेचा आज पहिला दिवस कोल्हापूर : प्रभात फेरी, वाद्यांचा गजर आणि लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. जिल्ह्यासह शहरातील शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे आणि गणवेशाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली. विविध शाळांचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते केला जाईल. मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील. शालेय पोषण आहारासह गोड खाऊ वाटप केला जाणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंच्या सुमारे पावणेचार लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील या खाटांगळे (ता. करवीर) येथील शाळेतील प्रवेशोत्सवासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने नवोदितांच्या स्वागतासह प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण केली असल्याचे मंडळाच्या प्रभारी प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी सांगितले. दरम्यान, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा शासकीय आदेश निघेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे कृती समितीचे राज्यउपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
अकरावीसाठी ‘स्मार्ट’ प्रवेश ‘अॅप’चा वापर
By admin | Published: June 14, 2016 11:43 PM