शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कर्मचाऱ्यांचे युजर आयडी-पासवर्ड बंद, कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा बांधकाम संघटनेची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 5:22 PM

अन्यथा स्वातंत्रदिनी जिल्ह्यातील ४० हजार बांधकाम कामगार मोर्चाने बेमुदत महामुक्काम आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दीड महीन्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड बंद केल्याने या कार्यालयातील कामकाज बंद आहे. या विरोधात लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा कमिटीने गुरुवारी शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. कामगार कल्याणकारी मंडळाने दीड महिन्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड बंद करून ते कामगार मंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात दिलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाज गेले दीड महिना ठप्प झाले आहे. यामुळे कामगारांच्यामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण झाला आहे. कल्याणकारी मंडळ हे मंत्र्यांची मनधरणी करण्यासाठी इतर जिल्ह्यातील कार्यालयाकडील कामकाज दिड- दिड महीने बंद करून मंत्र्यांची मर्जी संभाळत आहे, हे निषेधार्ह आहे. त्यामुळे मंडळाने कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी, नुतनीकरण तसेच लाभाच्या अर्जांचा १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत १०० टक्के निपटारा करावा अशी मागणी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या कार्यालयाकडील सर्व नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे सर्वच अर्ज मंडळाने या कार्यालयात युजर आयडी व पासवर्डची संख्या वाढवुन १४ ऑगष्टपर्यंत १०० टक्के पुर्ण करावेत अन्यथा १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्रदिनी जिल्ह्यातील ४० हजार बांधकाम कामगार मोर्चाने बेमुदत महामुक्काम आंदोलनाचा इशारा दिला.                            या आंदोलनात जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा जनरल सेक्रेटरी शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, भगवानराव घोरपडे, विक्रम खतकर, शिवाजीराव मोरे, आनंदा कराडे, मनोहर सुतार, नुरमहमद बेळकुडे आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

  • आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून  रिपोर्ट न देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा.  त्याबदल्यात बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा. 
  • मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीना २ हजार रुपये द्या. तसेच मध्यान्ह भोजन योजनेची स्मार्ट कार्ड तालुकास्तरीय मेळावे घेऊन कामगारांना वाटप करा. 
  • घरकुल योजनेचे अर्ज मंजुर होऊनही त्यांचे अनुदान अध्याप खात्यावर वर्ग झाले नाही ते तात्काळ करावे, कार्यालयाकडे दाखल झालेले घरकुल योजनेचे अर्ज तातडीने मंजुर करावे. 
  • लाभाचे अर्ज मंजुरचे मेसेज येऊनही खात्यावर रक्कम जमा झाली नाही, त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करून रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा करावी.
  • कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण, व लाभाच्या अर्जाची तृटी आल्यास, ७ दिवसात तृटी अपडेट न केल्यास अर्ज रिजेक्ट होतो सदर अट तात्काळ रद्द करावी.
  • घरकुल योजनेमध्ये कामगाराच्या वडीलांच्या नावावर किंवा महीला कामगारांच्या सासऱ्याच्या नावावर जागा असल्यास समंती पत्रावर घरकुल मंजूर करावे. 
  • ग्रेस पिरेड मधील कामगारांना नैसर्गिक, अपघाती मृत्यू लाभ,देण्यात यावेत .
टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन