फोटो (२२०७२०२१-कोल-व्ही एम पाटील (न्यू कॉलेज)
शिक्षक समितीकडून कोविड सेंटरमध्ये फळवाटप
कोल्हापूर : राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहर शाखेच्यावतीने व्हाईट आर्मीकडून चालविण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमधील लोकांना फळे आणि खाऊवाटप करण्यात आले. समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी समितीच्या उपक्रमांची माहिती दिली. समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांगितले. यावेळी उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, उत्तम कुंभार, सुभाष धादवड, सुनील पाटील, अनिल शेलार उपस्थित होते.
कमला कॉलेजमध्ये पालक सभा
कोल्हापूर : येथील कमला कॉलेजमध्ये ऑनलाइन पालकसभा ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कॉलेजमधील शिक्षक पालक संघ आणि शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित कोरोना कालखंडातील आपले आरोग्य विषयावर वेबिनार घेण्यात आला. त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते झाले. ॲक्युप्रेशर तज्ज्ञ अरविंद पालके यांनी मार्गदर्शन केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सुजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमन बुवा यांनी आभार मानले.