कोल्हापूर : शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बालसदस्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा,’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० झाडे लावून ती जतन करण्याचा निर्धारही केला आहे.जुना बुधवार पेठ उपविभागीय पोलीस कार्यालय येथील मैदानावर हे वृक्षारोपण करण्यात आले. या २० झाडांची निगा राखण्यासाठी झाडांसभोवती या मुलांनी कुंपण घातले. कुंपणासाठीच्या काठ्या मुलांनी स्मशानभूमीतून आणून त्यापासून कुंपण केले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपक्रमात चिन्मय स्वामी, ओम स्वामी, रुद्र स्वामी, शिवतेज यादव, विश्वराज पाटील, परवेज मुल्ला, अथर्व मोतीपुरे, सुमित जाधव, शौर्य जाधव, मयूर सुतार, ऋषी सुतार, हर्षद डफळे, ऋतू कदम, रणवीर कदम, यशराज अधिक, सूर्यादित्य कदम, प्रसाद पाटील, संग्राम शिंदे या बालसवंगड्यांचा सहभाग होता. त्यांना उदय भोसले, कुणाल भोसले, रणजित भोसले, रणजित कदम, विजय चव्हाण, विजय खोत, पिंटू स्वामी, रविराज भोसले, अजिंक्य भोसले, रोहित पाटील, आदींनी सहकार्य केले.