शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

corona virus-विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:43 PM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ड्युटीपालकांना कोरोनाची धास्ती; शाळा, महाविद्यालय परिसरात शांतता

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.दोन दिवसांपूर्वीच याबाबतची सूचना विद्यार्थी, पालकांना शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती. वर्ग भरले नसल्याने नेहमी गजबजलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सोमवारी शुकशुकाट पसरला होता.

दहावी आणि बारावीचे पेपर असणाऱ्या परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांत परीक्षार्थी दिसून आले. वार्षिक नोंदी करणे, चाचणी परीक्षा आणि दहावी, बारावीच्या झालेल्या पेपरची तपासणी, हजेरीपत्रक पूर्ण करणे, आदी स्वरूपातील कामे शिक्षकांकडून सुरू होती. स्वच्छतेसह अन्य स्वरूपातील कामे शिक्षकेतर कर्मचारी करत होते.

दि. २७ मार्चपासून विद्यापीठाच्यावतीने परीक्षा होणार आहेत. त्याच्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिकांमध्ये काही विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. खासगी क्लासेसदेखील भरले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णत: सुट्टी मिळाली.गल्लींमध्ये क्रिकेट, फुटबॉल रंगलासुट्टी असल्याने गल्ली, कॉलनीतील रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे क्रिकेट, फुटबॉल, आदी खेळ रंगले. मात्र, पालकांमध्ये कोरोनाबाबतची धास्ती आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी जाताना मास्क वापरण्याचे बंधनकारक करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुले, मुली या मास्क घालून वावरत असल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गांना सुट्टी देण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. कर्नाटक सरकारने वार्षिक परीक्षा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसा विचार आपल्या शासनाने करावा. त्यासाठी सहामाही परीक्षा, अन्य चाचणींच्या आधारावर वार्षिक गुणदान करण्याचा विचार करावा.- संतोष आयरे, प्राथमिक शिक्षक

कोरोनाबाबतची सध्याची स्थिती लक्षात घेता वर्ग भरत नाहीत हे योग्य आहे. परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ते लक्षात घेता विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचण आल्यास शिक्षकांनी मोबाईलच्या माध्यमातून त्याचे निराकरण करावे.- अमृत खुपेरकर, महाविद्यालयीन विद्यार्थी 

निवासी शाळा सुरूचजिल्ह्यातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चंपर्यंत भरणार नाहीत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. मात्र, जिल्ह्यातील काही निवासी शाळा अद्याप सुरूच आहेत. त्याबाबत असा निर्णय होणे आवश्यक आहे.आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • प्राथमिक शाळा : ३७०४ (विद्यार्थी : ६,९४,७१२)
  • माध्यमिक शाळा : ८६८ (विद्यार्थी : ४,०८,९७१)
  • उच्च माध्यमिक शाळा : २६२
  • इंग्रजी माध्यमाच्या शाळा : सुमारे ५००
  • कोल्हापूर महानगरपालिका शाळा : ५९
  • खासगी क्लासेस : सुमारे ५०० (विद्यार्थी : १० हजार)

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरSchoolशाळा