कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी १७ हजार ४७२ नागरिकांना कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात आली. १७३ केंद्रांवर ही लस देण्यात आली.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास पुण्याहून कोल्हापुरात ३५ हजार डोस आणण्यात आले. पहिल्या तासाभरात शहरातील सर्व केंद्रांना आणि त्यानंतर ग्रामीण भागातील केंद्रांना लसीचे वितरण करण्यात आले. शहरामध्ये दुपारी १२ नंतर, तर ग्रामीण भागामध्ये त्यानंतर उशिरा लसीकरण सुरू झाले. चंदगड, आजरा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत अधिक उशिरा लसीकरण सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणजे केवळ १७ हजारांहून अधिक नागरिकांना लस देता आली.
यातील ११ हजार ७१८ नागरिकांना पहिला डोस, तर ५७५४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. आज, शुक्रवारी लस येणार की नाही याचा निरोप नाही. मात्र आजची शिल्लक लस असल्याने सकाळपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र दिवसभरासाठी पुरेल एवढी लस नसल्याने सकाळच्या टप्प्यात गर्दी होण्याची शक्यता आहे.