इचलकरंजी : लसीकरण व चाचणी झालेल्या कामगारांना कामासाठी जाताना अडवू नये. उद्योगाबाबत योग्य नियमावली असणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक प्रशासन प्रक्रिया उद्योग बंद करत असून त्याला औद्योगिक संघटनांचा विरोध असल्याचे निवेदन इंजिनिअरिंग औद्योगिक संघटनांच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले.
निवेदनात, सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची अट उद्योजक व कामगार दोघांनाही गैरसोयीचे आहे. त्यामुळे लसीकरण व चाचणी झालेल्या कामगारांना कामावर जाताना अडवू नये. स्थानिक प्रशासनाकडून सेवा उत्पादने, शेती निर्यात पूरक उत्पादने व निरंतर प्रक्रिया उद्योग बंद पाडण्याचे प्रयत्न करत आहे. याला औद्योगिक संघटनांचा विरोध आहे. त्यास अनुसरून उद्योगासाठी नियमावली असणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.
याप्रसंगी मंत्री यड्रावकर यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे, उपाध्यक्ष संजय चौगुले इचलकंरजी इंजीनियरिंग असोसिएशनचे हेमंत कुलकर्णी, स्लीमाचे संजीव मालू, शीतल केटकाळे, संतोष सुतार, सुधीर अकीवाटे, गजानन मानधना आदी उपस्थित होते.
( फोटो ओळी)
इंजिनिअरिंग औद्योगिक संघटनांच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले.