कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत रविवारी शहरात अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर तसेच खासगी रुग्णालयात एकूण २३४३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आज, सोमवारी काही केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे २००, फिरंगाई येथे २०२, राजारामपुरी येथे २३२, पंचगंगा येथे १३९, कसबा बावडा येथे १९, महाडिक माळ येथे ४००, आयसोलेशन रुग्णालय येथे २२१, फुलेवाडी येथे १०५, सदरबाजार येथे १९१, सिद्धार्थनगर येथे १९७, मोरे माने नगर येथे २१९, सीपीआर येथे २०१ तर उर्वरीत खासगी रुग्णालयात १७ एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत ९५ हजार ०५४ इतक्या नागरिकांना पहिल्या डोसचे तर ११हजार ८६७ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
सद्या कोविड-१९ चा उपलब्ध लससाठा पाहता आज, सोमवारी राजारामपुरी, पंचगंगा, सदरबाजार, कसबा बावडा, फुलेवाडी व सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस तसेच सावित्रीबाई फुले, राजारामपुरी, पंचगंगा, सदरबाजार, कसबा बावडा, फुलेवाडी व आयसोलेशन व सीपीआर हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.