कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता जाणाऱ्या विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांसाठी सोमवारी नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेत ४८ विद्यार्थ्यांना व ६४ दिव्यांग नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
परदेशात जाणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना पहिला डोस व २३ जणांना दुसरा डोस, तर ५४ दिव्यांग नागरिकांना पहिला डोस व १० जणांना दुसरा डोस कोव्हॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले. आज, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता ऑनलाईन बुकिंग स्लॉट उघडण्यात येणार असून, ज्या नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग केले आहे अशाच नागरिकांना बुधवारी महापालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे.