लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : दादा जनवाडे :
निपाणी तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. यामुळे तालुका प्रशासनाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे. निपाणी तालुक्यात आतापर्यंत ५४ हजार ४४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचाही सहभाग आहे. १ एप्रिल २०२१ पासून निपाणी तालुक्यात ५८ लोकांचे कोरोनाने मृत्यू झाले आहेत. १९० जणांचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाला आहे. सध्या १५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ६५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे एकूण २१७ अॅक्टिव्ह रुग्ण तालुक्यात आहेत.
निपाणी शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. बुधवारी दिवसभरात निपाणी शहरात एकही रुग्ण आढळला न्हवता. यामुळे निपाणीला दिलासा मिळाला आहे. निपाणी तालुक्यातील विविध केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. तालुका प्रशासन प्रत्येक पंचायत क्षेत्रात जाऊन लसीकरण करत आहे सोबतच कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णात घेत झाली असून तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
निपाणी तालुका हा महाराष्ट्राशी निगडित असल्याने याकडे सर्वांचे लक्ष होते. तालुक्यातील हजारो नागरिक दररोज महाराष्ट्रात नोकरीसाठी जात असल्याने कोरोनाची अधिक भीती तालुका प्रशासनाला होती. पण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे.
अॅक्टिव्ह रुग्ण : २१७ एकूण लसीकरण : ५४४४६ कोरोनाने मृत्यू : ५८ (१ एप्रिलपासून)
नैसर्गिक मृत्यू : १९०