कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील ३,५४२ नागरिकांना गुरुवारी लसीकरण करण्यात आले. दरम्यान, आज (शुक्रवारी) लस उपलब्ध नसल्याने लसीकरण प्रकिया स्थगित ठेवण्यात आली आहे. लस आली... आली म्हणताना ती संपल्याने नागरिकांना आता पुन्हा लस येण्याची प्रतीक्षा लागली आहे.
गुरुवारी झालेल्या लसीकरण मोहिमेत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३१६, फिरंगाई येथे २९१, राजारामपुरी १९३, पंचगंगा ३८३, कसबा बावडा ३००, महाडिक माळ ३००, आयसोलेशन ३०१, फुलेवाडी ३२०, सदर बाजार २६६, सिद्धार्थनगर २२९, मोरे-माने नगर २९४ व सीपीआर हॉस्पिटल येथे ३४९ एवढ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले.
महापालिकेने आतापर्यंत एक लाख १२ हजार ६०५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ३८ हजार ९७१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण केले आहे.
पुरेशी लस उपलब्ध नसल्याने शुक्रवारी महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिका सुत्रांनी दिली.