कोल्हापूर : कोल्हापुरात ज्येष्ठांना लसीकरण सुरू झाल्याच्या पाचव्या दिवशी तब्बल साडेदहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्हा परिषद, सीपीआर, महापालिका, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यातील हा शुक्रवारपर्यंतचा आकडा आहे.
कोल्हापुरात सोमवारपासून लसीकरण सुरू झाले आहे. ६० वर्षांवरील ६ लाख ज्येष्ठ नागरिक, तर ४५ ते ६० वयोगटांतील साडेतीन लाख व्याधीग्रस्त नागरिक नागरिक कोविड वेबसाइटवर नोंदणी करून आरोग्य केंद्रावर जाऊन लस टोचून घेत आहेत.
गावामध्ये जनजागृतीची जास्त गरज असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दवंडी देणे, माइकवरून आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय आरोग्य विभागाने लसीकरण साठी येत असताना कोणती कागदपत्रे सोबत आणावीत, ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तयार केला आहे.
शुक्रवारपर्यंत व्याधीग्रस्त १६२८, तर ज्येष्ठ नागरिक आठ हजार ८६३ असे एकूण १० हजार ४९१ इतक्या नागरिकांनी लस घेतली.