कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून मंगळवारी कोविशिल्डचे ४२९२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर २७ व १८ ते ४५ वर्षापर्यंत ३०८० नागरिकांचे, ४५ ते ६० वर्षापर्यंत ७१८ नागरिकांचे व ६० वर्षावरील ४६७ नागरिकांचे लसीकरण झाले.
आज, बुधवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना कोविशिल्डचा पहिला डोस व १८ वर्षावरील ८४ दिवस पूर्ण झालेल्या दिव्यांग बांधवांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनीच फक्त प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमानेनगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर लसीकरण होणार आहे.