कोल्हापूर : महानगरपालिका मार्फत मंगळवारी सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटल येथे १०२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीची उपलब्धता तसेच ८४ दिवसांची अट घातल्यामुळे लसीकरणाची गती एकदम संथ झाली आहे.
यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले ११९, फिरंगाई ५५, राजारामपुरी ८, पंचगंगा २३, महाडीक माळ १०, फुलेवाडी येथे २० व सीपीआर हॉस्पिटल येथे १६४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत १ लाख १६ हजार २२८ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४० हजार ९७० नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.
आज, बुधवारी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या तसेच ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.