फोटो ओळ : आतापर्यंत कोल्हापुरात देवाच्या दर्शनासाठी, रेशनसाठी, मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहिले; पण आता कोरोनामुळे जीवन-मरणाचा प्रश्न तयार झालेल्या कोविड लसीकरणासाठी भल्या पहाटे उठून रांगा लावण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
०८०७२०२१-कोल-लसीकरण रांग ०१
फोटो ओळ : कोविशिल्ड लसींचे डोस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने गुरुवारी पहाटेपासूनच शहरातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. फिरंगाई येथील केंद्रावर आपले नाव यादीत पाहण्यासाठी अशी झुंबड उडाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
०८०७२०२१-कोल-लसीकरण रांग ०२
फोटो ओळ : लस उपलब्ध झाली आहे, म्हटल्यावर कोल्हापूरकरांनी केंद्रावर एकच गर्दी केली. फिरंगाई येथील केंद्रावर तर प्रचंड वादावादीचे प्रकार घडले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
०८०७२०२१-कोल-लसीकरण रांग ०३
फोटो ओळ : कोरोनापासून बचाव व्हावा व आयुष्य वाढावा या उद्देशाने लसीकरण वाढवले आहे. गुरुवारी लसीकरण केंद्राजवळ आयुष्यमान भारत लिहिलेल्या या फलकाला लागूनच लसीकरणाच्या प्रतीक्षेत बसलेल्या या महिलांना पाहिल्यावर आयुष्य वाढवण्यासाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार याची चिंता दिसली.
(छाया : आदित्य वेल्हाळ)
०८०७२०२१-कोल-लसीकरण रांग ०४
फोटो ओळ : लसीकरणासाठी शहरातील इतर केंद्रांबरोबरच शनिवार पेठेतील केंद्रावर तर तुफान गर्दी झाली. रांग लांबच लांब लागली होती. सोशल डिस्टन्सचे कोणतेही पालन होत नव्हते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)
०८०७२०२१-कोल-लसीकरण रांग ०५
फोटो ओळ : भुकेल्यांनी अन्नासाठी टाहो पसरावा तसे नागरिक लस मिळण्यासाठी तळमळताना दिसत होते. शनिवार पेठेतील लसीकरण केंद्रावर बॅरिकेड्स लावून गर्दी नियंत्रणात ठेवली जात होती; पण नागरिक आपला नंबर कधी येईल याकडे आशाळभूत नजरेने पाहत होती.
(छाया : आदित्य वेल्हाळ)