कोल्हापूर : ऑनलाईन अपॉईंटमेंट ( दि. ६ ते ८ मे पर्यंत) घेतलेल्या नागरिकांना कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण आज, शनिवारी करण्यात येणार आहे.
महापालिकेकडील उपलब्ध लस साठा पाहता वय वर्षे ४५ वरील कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे पूर्ण संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याने दुसऱ्या डोससाठी सर्व नोंदणी केलेल्या नागरिकांना सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोस देण्यात येणार आहे. संबंधितांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी फोन केले जाणार आहेत त्यांनीच फक्त संबंधित लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी कोविन पोर्टलवर शनिवारची ऑनलाईन वेळ घेतली आहे त्यांनी भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर येथील केंद्रावर लस दिली जाणार आहे.
शहरात ८२६ नागरिकांचे लसीकरण
शक्रवारी शहरात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकूण ८२६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये राजारामपुरी १४२ , कसबा बावडा ११०, महाडिक माळ १९३, मोरेमाने नगर ७५ व सीपीआर हॉस्पिटल ३०६ नागरिकांचा समावेश आहे. इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.