ठळक मुद्देलसीअभावी जिल्ह्यातील लसीकरण ठप्प नागरिकांना लसीची प्रतीक्षा
कोल्हापूर : गेले सहा दिवस केवळ एकावेळचा अपवाद वगळता लसच न आल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या लसीची प्रतीक्षा आहे.गेले महिनाभर लसीकरण लसीअभावी मध्येच बंद पडत आहे. आता तर सलग सहा दिवस लसच आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस आले होते. ते केवळ कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी वापरण्यात आले. कोव्हिशिल्डचा एकही डोस सहा दिवसांत उपलब्ध झालेला नाही.बुधवारी दिवसभरामध्ये ३० लसीकरण केंद्रांवर एकूण ३५५ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामध्ये २८७ जणांना पहिला तर केवळ ७८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गुरुवारी लस मिळणार की नाही याचा निरोप बुधवारी रात्री दहापर्यंत अधिकाऱ्यांना आलेला नव्हता.