शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

१२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडेसात लाख लोकांना १२० आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयांतून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोवीन ॲपद्वारे नाव नोंदणी करावी व प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शल्यचिकित्सक अनिल माळी, शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना काळात प्रशासनाने आयुष सर्व्हे केला होता, त्यानुसार व्याधीग्रस्त व ज्येष्ठांची आकडेवारी उपलब्ध झाली असून सर्व यादी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. ते घरोघरी जाऊन ज्येष्ठांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी मदत करतील. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी जनजागृती करतील. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनदेखील लसीकरण करता येईल; मात्र गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आधी ऑनलाईन नोंदणी करावी.

--

लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थी

६० वर्षांवरील व्यक्ती : ५ लाख ९ हजार -

४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त लाभार्थी : १ लाख ५२ हजार ९४८

विभाग : नोंदणीकृत लाभार्थी : लसीकरण झालेले लाभार्थी

आरोग्य कर्मचारी : ३८ हजार २५६ : २६ हजार ९६५

फ्रंट लाईन वर्कर : २९ हजार ८८९ : ८ हजार ९७५

एकूण लाभार्थी : ७ लाख ३१ हजार ३७३ : ३५ हजार ८३०

----

लोकप्रतिनिधींनी पुढे यावे

लसीकरणाबाबत कोणताही गैसरमज न बाळगता लोकांनी पुढे यावे. नागरिकांमध्ये लसीबाबत विश्वास वाढावा यासाठी ६० वर्षांवरील लोकप्रतिनिधी, गावागावांतील पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.

----

व्याधीग्रस्तांसाठी प्रमाणपत्र आवश्यक

मधुमेह, ह्दयविकार, पॅरालिसीस, किडनीशी संबंधित आजार, स्टेरॉईड, कॅन्सर, रोगप्रतिकारकशक्ती कमी करणारे कोणतेही आजार अशा जवळपास २० व्याधींची नावं लसीकरण मोहिमेत घेण्यात आली असून, या नागरिकांच्या लसीकरणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या नागरिकांनी मेडिकल प्रॅक्टिशनर्सकडून व्याधीचे प्रमाणपत्र घेऊन त्याची सॉफ्ट कॉपी ऑनलाईन नोंदणीसोबत जोडावी व लस घेण्यासाठी जाताना हे प्रमाणपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे.

---