कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी आज, शुक्रवारी सकाळी ९ ते २ यावेळेत महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर विशेष कॅम्पद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या संधीचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरातील जे दिव्यांग बांधव लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही अशा दिव्यांग बांधवांसाठी विशेष लसीकरण मोहीम पुढील आठवड्यात राबविण्यात येणार आहे. अशा दिव्यांग नागरिकांनी (9604364652 / 9960151008 / 7020369360) या क्रमांकावर संपर्क करून आपल्या नावाची नोंदणी करावी. या लसीकरणासाठी दिव्यांग नागरिकांनी अपंगत्वाचा दाखला व आधार कार्ड घेऊन आपल्या नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-शहरात १०९२ नागरिकांचे लसीकरण-
गुरुवारी आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील ६४० नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व ४५२ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला.