कोल्हापूर : जिल्ह्यातील ११०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस आज शनिवारी सकाळी साडेदहा नंतर दिली जाणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून, शुक्रवारी दुपारी शहरातील आरोग्य संस्थांमध्ये लस पोहोच करण्यात आली आहे. अकराही केंद्रांवर ११०० लाभार्थ्यांच्या याद्या पोहोचल्या आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील लसीकरण मोहिमेची तर पालकमंत्री सतेज पाटील सीपीआरमधील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ तालुक्यातील लसीकरण प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत.
चौकट
या ठिकाणी होणार लसीकरण
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सीपीआर कोल्हापूर, सेवा रुग्णालय कसबा बावडा. कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील महाडिक माळ, सदर बाजार नागरी आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा रुग्णालय शुक्रवार पेठ आणि राजारामपुरी नागरी आरोग्य केंद्र तसेच आयजीएम रुग्णालय इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, कागल ग्रामीण रुग्णालय, शिरोळ ग्रामीण रुग्णालय अशा एकूण ११ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.