कोल्हापूर : आज सर्वत्र वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जन्मो जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला वडाच्या झाडाची पुजा करत आहेत. अशातच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच ताराबंळ उडाली.अंबाबाई मंदिर परिसरात मोठे वडाचे झाड आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी याठिकाणी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला. कापूर आणि उदबत्तीमुळे झाडाला बांधलेल्या दोऱ्याला ही आग लागली. मंदिर परिसरातील यंत्रणेची आग विझविण्यासाठी तारांबळ उडाली. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
video- वटपौर्णिमेची पूजा सुरू असतानाच वडाच्या झाडाला लागली आग, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 2:32 PM