कोल्हापूर : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.पाश्चिमात्य संस्कृतीतील सण म्हणून ओळखला जाणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ आता भारतीय संस्कृतीत अन्य सणांप्रमाणे या दिवसाचीही जय्यत तयारी केली जाते. तरुणाईत फुलणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवसाचे औत्सुक्य अधिक आहे.
इतकेच नव्हे तर पती-पत्नी, भाऊ-बहीण या कौटुंबिक नात्यांचे रंग अधिक गहिरे करणारा दिवस म्हणूनही या ‘व्हॅलेंटाईन डे’ने घराघरांत आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच अवघ्या काही तासावर आलेल्या या गुलाबी दिवसाची लगबग सर्व महाविद्यालय, प्रमुख बाजारपेठांमध्ये दिसून येते आहे.
भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी....शहरातील भेटवस्तूंच्या दुकानातील अनेकविध प्रकारातील वस्तूंनी ग्राहकांचे मन आकर्षून घेतले आहे. मराठीसह इंग्रजीत लिहिलेले प्रेमाचे शब्द असलेले आकर्षक संगीत वाजणारे ग्रिटींग, वेगवेगळ््या आकारातले टेडी बेअर, परफ्युम्सचे कॉम्बी पॅक अशा अनेकविध वस्तू बाजारात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला या वस्तूंची खरेदी व गुलाबाचे फुल खरेदी करण्यासाठी युवक-युवतींची गर्दी झाली होती.
सामाजिक झालर...प्रेमाचा संदेश देणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला सामाजिक कार्याची झालर देत. आवडत्या व्यक्तींवर प्रेम कराच, पण रक्ताची नाती जोडा, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासह अन्याथ आश्रम, वृध्दाश्रम यांच्या सोबत हा दिवस साजरा करण्याचे काही युवा ग्रुपच्यावतीने नियोजन केले आहे.
सेल...सेल....प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी युवक - युवती नवीन कपडे खरेदी करण्याचा क्रेझ सध्या वाढत आहे. ग्राहकांना आकर्षत करण्यासाठी अनेक कपडे विक्रेत्यांनी विशेष व्हेलेंटाईन डे सेलचे नियोजन केले आहे. तसेच अनेक हॉटेलमध्ये पार्टीसह विशेष मेनू तयार करण्यात आला आहे.
युवा आॅर्गनायझेशनतर्फे रक्तदानयुवा आॅर्गनायझेशन व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी राजारामपुरी पहिली गल्ली उद्यान येथे बुधवारी सकाळी ८ ते सांयकाळी ७ पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. गेली अकरा वर्षापासून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येते.
यावर्षी ५०० पेक्षाजास्त रक्ताचे संकलन करणेचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा आॅर्गनायझेशन मंदार तपकिरे, सोनल शिर्के, विक्रम आंबले, अनिकेत कोरगांवकर, मुकुल शहा, सत्यजित जाधव, अवधूत भोसले यांनी केले आहे.