शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

वारणानगर लुटीचा सीआयडी तपास सुरू

By admin | Published: April 21, 2017 12:48 AM

पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम कोल्हापुरात; हर्ष पोद्दार यांच्याकडून घेतली गुन्ह्याची माहिती

कोल्हापूर/सांगली : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासाचा आढावा गुरुवारी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभागाने (सीआयडी)कोल्हापुरातील शनिवार पेठेतील कार्यालयात दिवसभर घेतला. यासाठी या विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम आले आहेत. तपास अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे देऊन या गुन्ह्याची संपूर्ण माहिती कदम यांना दिली.वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संगनमत करून सुमारे नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविला. या प्रकरणी तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सातजणांना निलंबित केले आहे. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभाग (सीआयडी) यांच्याकडे वर्ग केला. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार गुरुवारी सकाळी सीआयडी पुणे विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह कोल्हापूरचे सहायक पोलिस अधीक्षक तथा तपास अधिकारी हर्ष पोद्दार शनिवार पेठेतील ‘सीआयडी’च्या कार्यालयात आले. त्यांनी वारणानगर येथे सांगली पोलिसांनी मारलेल्या डल्ल्याच्या माहितीसह आजपर्यंतच्या एकूण तपासाची माहिती दिली. तसेच कदम यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी कोल्हापूर (सीआयडी)चे पोलिस अधीक्षक आर. आर. बनसोडे उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ‘सीआयडी’चे पथक वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत गेले असल्याचे समजते.निलंबित पोलिसांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नसांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांची रोकड लंपास केल्याच्या आरोपातील संशयित स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सात पोलिसांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. सीआयडी पथक त्यांचा शोध घेत असले तरी, पथकाला अजून कोणाचाही सुगावा लागलेला नाही. ‘त्या’ पोलिसांची लवकरच बडतर्फीवारणानगरातील या लूट प्रकरणातील निलंबित पोलिसांवर लवकरच बडतर्फीची कारवाई होण्याचे संकेत आहेत. ‘त्या’ खोलीची आज पाहणी पुढील दोन दिवस पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम कोल्हापुरातच मुक्काम ठोकणार असून, या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले. वारणानगर येथील ज्या खोलीतील पैशांवर सांगलीच्या पोलिसांनी गतवर्षी डल्ला मारला त्या खोलीची पाहणी कदम यांच्यासह सीआयडीचे अधिकारी आज, शुक्रवारी करणार असल्याचे कोडोली पोलिसांनी सांगितले.