कोल्हापूर : एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लाल परीची’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोल्हापूरात सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशी दत्तात्रय खोडके, मंगला खोडके यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवासी, नागरिक यांच्यासह एस.टी. कामगारांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती. एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तंूच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातील प्रमुख बसस्थानकांवरील एस. टी.प्रेमी संघटना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ‘एस. टी. विश्व’ हे फिरते प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १९४८ पासून अर्थात एस.टी.च्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या विविध स्थित्यंतरांचे दर्शन प्रवाशांना होणार आहे.
एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तंूच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. याप्रसंगी ज्युनिअर आगार व्यवस्थापक दयानंद पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, कामगार अधिकारी मनिषा पवार यांच्यासह अधिकारी, कामगार व प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकवाहिनी असलेल्या एस.टीने मागील काही वर्षात स्वत:मध्ये आमूलाग्र बदल केल आहेत. एक नवीन रुप एस.टीने परीधान केले आहे. आजच्या युगाच्या आधुनिक लाल परीची इतिहास या प्रर्दशनातून पाहण्यास मिळतो. सर्वांसाठी मोफत खुले असून यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावी.- अजय पाटील, आगार व्यवस्थापक कोल्हापूर
सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन पाहण्याची संधी
- गडहिंग्लज : २५ जून
- इचलकरंजी : २६ जून
- सांगली : २१ जून