पेठवडगाव : महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई संस्थेच्या आवाहनानुसार येथील महालक्ष्मी तलावावर पक्षीगणना करण्यात आली. यामध्ये ४१ जातींचे २१४ पक्षी आढळले.चावरे (ता. हातकणंगले) येथील विवेकानंद फौंडेशन, पीपल्स फॉर अॅनिमल यांच्या सहकार्याने ही पक्षीगणना करण्यात आली. महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्याचे निमंत्रित सदस्य युवराज पाटील, पेटा संघटनेचे सदस्य व वन्यजीव छायाचित्रकार संदीप पाटील, सुरेश चिबडे, डॉ. अमोल पाटील, नीलेश घारसे यांनी नियोजन केले. या गणनेत डॉ. अजित चव्हाण, नगरसेवक गुरुप्रसाद यादव, उदय ढवळे, संतोष लडगे, धनाजी वाघ, प्रकाश भाकरे, अनंत ढवळे, आदींसह ५० हून अधिक पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदविला.राज्यभर पक्षीसप्ताहपक्षीतज्ज्ञ डॉ. सलिम अली यांची जयंती व माजी वन अधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त ५ व १२ नोव्हेंबर या सप्ताहात राज्यभर पक्षीसप्ताह साजरा केला जातो.पक्षी व त्यांची संख्या - वेडा राघू - ११, सामान्य सातभाई - १०, स्टोन च्याट - १, वटवट्या - २, बुलबुल - १९, लाफिंग डव - ५, कावळा- २३, भारद्वाज - २, इंडियन रॉबिन-५, माळ तिटवी - १, ग्रे फ्रँकलिन - २, कोतवाल - ४, छोटा बगळा - २, पॉण्ड हेरॉन - १, लिटल कार्मोरंट - ४, मोर - ३, ग्रे हेरॉन - ९, ब्राह्मणी काईट -३, व्हाइट व्यागटेल - १, लिटल स्टिंट - २, सॅण्ड पाइपर - २, खंड्या - १, कापशी घार - १, जांभळा शिंजीर - १२, भारतीय पोपट - ४, प्लम हेडेड पँराकीट - ४, पॉण्ड हेरॉन - २, इंडियन मैना - ६, हळदी कुंकू बदक - ६, कोकिळा - २, चंडोल - १४, पारवा - ३, स्वालो - २९, स्टोन चॅट - १, स्पूनबिल - ३, कॉपर स्मिथ बारबेट - १, मध्यम बगळा - १, लिटिल रिंगड प्लवर - ५, ग्रे हार्नबिल - २, स्केली ब्रिस्टेड मुनिया - ५, पर्पल हेरॉन - १, पांढरा धोबी -१, रिव्हर्टर्न - २, ग्रे श्राइक - १. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० प्रकारचे जास्त पक्षी नोंद केले. एकूण ४१ पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळाले. यामध्ये सर्वांत जास्त कावळे २३, स्वालो (भिंगरी) २९, बुलबुल १९, वेडा राघू ११, तर सामान्य सातभाई १० च्मागील वर्षी ३१ प्रकारच्या ११८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती, तर यावर्षी ९६ हून अधिक पक्षी आढळले. एकूणच यावर्षी पक्षी प्रकार व त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली.
पेठवडगाव परिसरात विविध ४१ जातींचे पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:56 AM