सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत व समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरदेवाच्या त्रैवार्षिक जळ यात्रेला श्रींच्या प्रतिष्ठापनेने प्रारंभ झाला. आज (सोमवारी) पहिला पालखी सोहळा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्तात धार्मिक विधी पार पडले. याठिकाणी १४९ कलमानुसार कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, बाहेरगावच्या भाविकांनी येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या यात्रेसाठी पाच राज्यांमधील सुमारे पाच ते सहा लाख भाविक हजेरी लावतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वाशी गावात १४९ कलमानुसार समूह बंदी लागू केली असून, मोजकेच मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत. ग्रामस्थांनी व भाविकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.