सडोली (खालसा) : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी (ता. करवीर) येथील बिरदेवाच्या त्रैवार्षिक जळ यात्रेवर कोरोनाचे संकट आल्याने यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच यात्रा काळात कडक निर्बंध लावण्यात आले असून मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पाडावेत अशा सक्त सूचना करवीर उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपधीक्षक कार्यालयात सरपंच, उपसरपंच, सदस्य,
यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दर तीन वर्षांनी येणाऱ्या त्रैवार्षिक यात्रेस लाखो भाविक उपस्थित राहतात. परराज्यातून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने कोराना संसर्ग वाढण्याची भीती असून, या पार्श्वभूमीवर यात्रेवर कडक निर्बंध लावण्याची मागणी ग्रामस्थ करत होते
ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समितीने मानकरी यांनी उपाधीक्षकांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यात्रा काळातील चार दिवस चालणारे सर्व विधी निवडक लोकांच्या उपस्थित पार पाडण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी करवीर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, धनाजी लोहार, रणजित पाटील, बबन रानगे, सचिन पाटील अरूण मोरे रघुनाथ पुजारी रंगराव रानगे, संतोष पाटील, किरण पाटील,
यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समितीचे सदस्य पसरपंच आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
वाशी, ता.करवीर येथील बिरदेवाच्या जळ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस उपधीक्षक आर. आर. पाटील यांनी संबोधित केले. यावेळी बबन रानगे, करवीर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, धनाजी लोहार, रणजित पाटील उपस्थित होते.