शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

घेता का विस्कटू ;कवडीमोलाने भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:51 AM

कोल्हापूर : मेथीच्या चार पेंढ्या १0 रुपयांना , कोथिंंबिरीच्या दोन पेंढ्या पाच रुपयांना, कोबी फ्लॉवरचा किलोचा गड्डा १0 रुपयांना, ...

कोल्हापूर : मेथीच्या चार पेंढ्या १0 रुपयांना , कोथिंंबिरीच्या दोन पेंढ्या पाच रुपयांना, कोबी फ्लॉवरचा किलोचा गड्डा १0 रुपयांना, वांगी २0 रुपये किलो....हे दर आहेत, कोल्हापुरातील या आठवड्यातील भाजीपाल्याचे. घसरलेले दर पाहून घासाघीस करणाऱ्या ग्राहकालाही भाजीपाला घेताना लाज वाटू लागली आहे. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल दराने विकावा लागत असल्याने उत्पादक शेतकºयांच्याही डोळ्यांत अश्रू दाटले आहेत. मिळणाºया दरातून उत्पादनखर्च राहूदे वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने शेतकºयांचे अर्थकारणच विस्कटले आहे.पोषक हवामानामुळे दरवर्षी संक्रांत झाल्यापासून भाजीपाल्याची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. अलीकडे तर उसाची लागण रुंद पट्ट्याने करण्याकडे कल वाढल्याने उसातच आंतरपीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. परिणामी एकाचवेळी माल बाजारात येत असल्याने आवक वाढून दरामध्ये घसरण झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही घसरण सुरू असून, या आठवड्यात तर, दराने निच्चांक गाठला आहे.नोव्हेेंबरनंतर तुटलेल्या उसाची बिले अद्याप झाली नसल्याने हातात पैसा नाही. निदान भाजीपाल्याची विक्री करून तरी घरखर्च भागवावा म्हणून शेतकरी भाजीपाल्याचे बोचके घेऊन जवळची बाजारपेठ गाठत आहे; पण बाजारपेठेत गेल्यावर शेतकºयाच्या पदरी निराशा येत आहे. गवारी सोडली, तर आज कुठल्याही भाजीपाल्याला दर राहिलेला नाही. गवारी २0 ते २५ रुपये पावशेर आहे. ओरडून ओरडून विकले, तरी शेवटी वाहतूकखर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.औषधांचा खर्च निघेनादाट धुके, ढगाळ वातावरणासह सततच्या बदलणाºया तापमानामुळे भाजीपाला जगवण्याची कसरत शेतकºयांना करावी लागत आहे. बुरशी, पाने खाणाºया अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुरशीनाशकाची १00 मिलीलिटरची किंमत १५0 रुपये आहे. १00 मिलित चार पंप होतात. एक पंप फवारणीसाठी ५0 रुपये मजुरी द्यावी लागते. टॉनिकसह इतर फवारण्या, बियाणे, खते व मजुरीचा खर्च यात धरला, तर भाजीपाल्याची लागवड न केलेलीच बरी, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.मेथी, कोथिंबीर१00 रुपये शेकडाकिरकोळ बाजारात अक्षरश: कचरा झाला असताना, घाऊक बाजारात तर विचारायचीच परिस्थिती राहिलेली नाही. कोथिंबीर, मेथी, १00 ते २00 रुपये शेकडा पेंढी असा भाव आहे. कोबी, वांग्यांना १0 किलोचा दर ५0 ते ७५ रुपये इतका आहे.