शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

'देशी' प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा लघुपट- वीणा जामकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 4:57 PM

‘देशी’ लघुपटाची कथा ही मनाला स्पर्श करणारी असून हा लघुपट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे, असे मत अभिनेत्री वीणा जामकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे'देशी' प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा लघुपट- वीणा जामकरचिल्लर पार्टीचा पहिला लघुपट प्रदर्शित : प्रेक्षकांचा प्रतिसाद

कोल्हापूर : ‘देशी’ लघुपटाची कथा ही मनाला स्पर्श करणारी असून हा लघुपट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे, असे मत अभिनेत्री वीणा जामकर यांनी व्यक्त केले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा ‘देशी’ हा पहिला लघुपट आहे. राजेंद्रकुमार यांची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन रोहित बापू कांबळे यांनी केले आहे. या लघुपटाचे प्रदर्शन अभिनेत्री वीणा जामकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महावीर महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रसिद्ध अ‍ॅडव्होकेट सी. बी. कोरे, शासकीय अधिकारी अरविंद देसाई, चित्रपट अभ्यासिका प्रा. कविता गगराणी, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव, निर्माता राजेंद्र मोरे, दिग्दर्शक रोहित बापू कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.जामकर म्हणाल्या, देशी ही भावनिक आणि हृदयस्पर्शी कलाकृती असून त्यातून मांडलेला विषय हा व्यवस्थेला दिलेली एक चपराक आहे. कोल्हापूरने कलेच्या क्षेत्रामध्ये नेहमीच वेगळेपण जपले आहे. आजही कोल्हापूरमध्ये खूप चांगले दिग्दर्शक, लेखक निर्माण होऊन त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय तयार होत आहेत, ही फारच महत्त्वाची बाब आहे.मिलिंद यादव म्हणाले, आर्थिक पाठबळ असणारे चित्रपट क्षेत्रात अनेकजण आहेत; पण गरीब कुटुंबातील रोहित कांबळे याने देशीसारखा अंतर्मुख करायला लावणारा लघुपट बनविणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अ‍ॅड. सी. बी. कोरे म्हणाले, देशी ही शॉर्टफिल्म नसून बिग फिल्म आहे. या लघुपटातील आशय, लोकेशन, संगीत यासह सर्वच गोष्टी या वास्तववादी आहेत. दिग्दर्शकाचा अभ्यास व प्रचंड मेहनत यामागे असल्याचे दिसून येते. कोल्हापुरातील दिग्गज कलाकारांनी कोल्हापूरची माती ही याआधीच कसदार बनविल्यामुळे या मातीमधून चांगल्याच कलाकृती निर्माण होत राहणार याची साक्ष देशी हा लघुपट देतो.निर्माता राजेंद्र मोरे यांनी प्रारंभी स्वागत केले, तर अरविंद देसाई, अ‍ॅड. कोरे, वीणा जामकर यांच्या हस्ते लघुपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. जयभीम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर चिल्लर पार्टीचे रवींद्र शिंदे यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Short Filmsशॉर्ट फिल्मkolhapurकोल्हापूर