कोल्हापूर : शहरातील भाजी मंडईमुळे गुरुवारी रस्त्यांवरील लोकांची गर्दी वाढली. महापालिकेने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्र्यंत भाजी विक्री करण्यास परवानगी दिल्याने फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज येथील बंद झालेली भाजी विक्री पुन्हा जोमाने सुरू झाली.
अशीच स्थिती पद्माराजे उद्यानासह शहरातील इतर ठिकाणांची झाली आहे. कोल्हापूर महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी अथवा प्रत्येक प्रभागात ठरावीक अंतरावर बसून विक्री करण्याचे बंधनकारक केले. त्यामुळे फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज येथील भाजी विक्री दोन दिवस बंद झाली होती. मात्र, महापालिकेने भाजी विक्रीसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असा कालावधी निश्चित केला. यामुळे भाजी विके्रत्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. खरेदीसाठी नागरिकही मोठ्या संख्येने येथे गर्दी करीत आहेत. सायंकाळी पाचनंतर मात्र महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक, इस्टेट विभागाच्या पथकाने भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.करायला गेले एक आणि झाले एकभाजी खरेदीच्या नावाखाली नागरिक हातात पिशवी घेऊन मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. खरेदी तर करीत नाहीत. मात्र, फिरण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. अशांना चपराक बसण्यासाठीच महापालिकेने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत भाजी विक्री सुरू ठेवली. या व्यतिरिक्त कोणी भाजी खरेदी अथवा विक्रीस बाहेर आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी याची अंमलबजावणी केली. मात्र, नागरिकांची दिवसभर रस्त्यांवर पुन्हा गर्दी वाढली.लक्ष्मीपुरीत जत्राधान्य बाजारपेठ आणि भाजी विक्री यांमुळे लक्ष्मीपुरीमध्ये गुरुवारी जत्रेचे स्वरूप आले होते. पोलीस, महापालिका प्रशासनाकडून गर्दी करू नका, अंतर ठेवा, मास्क घाला, असे आवाहन केले जात होते. मात्र, लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.----------------------------------------------------------------------सोशल डिस्टन्सला हरताळएकीकडे कोल्हापुरात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळत येत असताना दुसरीकडे नागरिक आणि विके्रत्यांमध्ये मात्र, बेजबाबदारपणा दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागामधील महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर दोन विक्रेत्यांमध्ये ५० फूट अंतर ठेवून विक्री करणे बंधनकारक आहे. तसेच घरोघरी जाऊन भाजी विक्री करायची असताना विके्रते पुन्हा रस्त्यावरच बसत असून नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.-----------------------------------------------फोटो-१६0४२0२0-कोल-भाजी मंडई गर्दी१फोटो-१६0४२0२0-कोल-भाजी मंडई गर्दी२ओळी- कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज मार्गावर गुरुवारी धान्य आणि भाजी खरेदीसाठी रस्त्याला अक्षरश: जत्रेसारखे स्वरूप आले होते.-------------------------------------फोटो-१६0४२0२0-कोल-भाजी मंडई गर्दी३फोटो-१६0४२0२0-कोल-भाजी मंडई गर्दी४फोटो-१६0४२0२0-कोल-भाजी मंडई गर्दी५ओळी- कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन येथे अंतर न ठेवता भाजी विके्रते बसले असून नागरिक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.सर्व छाया : अमर कांबळे----------------------------------------------------------------------विनोद