कोल्हापूर : वाढत्या उन्हामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आठवडी बाजारात किलोमागे भाजीचे दर १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत; त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली असून, उन्हामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र आंब्याची आवक वाढल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.पाऊस सुरू झाल्याशिवाय ही स्थिती बदलणार नसल्याने, आणखी काही दिवस तरी महागडी भाजीच खावी लागणार आहे. तापमानवाढीसोबतच महागाईच्या झळांमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांची पावसाच्या सरींमुळेच यातून सुटका होणार आहे. काही मोजक्या भाज्यांचे दर स्थिर असले तरी नेहमीच्या वापरातील भाज्यांचे दर कडाडले आहेत.गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो असणारा टोमॅटोचा दर या आठवड्यात ६० रुपये किलोवर गेला. त्यात १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. अन्य फळभाज्या या ६० रुपये किलो झाल्या आहेत. मेथीचा दर २० रुपये पेंढी झाला, तर १५ रुपये किलोने मिळणारी वांगी आज ६० रुपये प्रतिकिलो झाली आहेत.
दरांत मोठी वाढगेल्या आठवड्यात असलेल्या ४० रुपयांच्या भाज्या व फळभाज्यांत या आठवड्यात २० रुपयांची दरवाढ झाली आहे. यामध्ये टोमॅटो, वांगी, गवार, कारले, हिरवा वाटाणा, हिरव्या मिरचीचा दर प्रतिकिलो ६० रुपये झाला आहे.
किलोचा दर कोबी (१५), फ्लॉवर (२०), काकडी (३०), गाजर (४०), पोकळा (१० रुपये पेंढी), दुधी भोपळा (१०), काटेभेंडी (५०), आले (६० ते ८०), करडई (१० रुपये पेंढी), तोंदली (४०), मुळा (१० रुपये पेंढी), भोपळा (४०), दोडका (५०), ढबू मिरची / सिमला मिरची (४०), कोबी (१० रुपये गड्डा), फ्लॉवर (१० रुपये गड्डा), बीट (१० रुपये नग), शेपू (१० रुपये नग).आंब्याची आवक वाढलीगेल्या महिन्यात आंबा पेटीचा दर एक ते दीड हजार रुपयांच्या घरात होता. या आठवड्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. रत्नागिरी हापूस, देवगड, कर्नाटक हापूस स्वस्त झाला आहे.
आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांसह उपनगरांतही टेम्पोतून आंबापेट्यांची विक्री होत आहे. सध्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व गुजरातमधील आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचे दर १०० ते ४०० रुपये प्रतिडझनपर्यंत आहेत.