उचगाव : उजळाईवाडी, ता. करवीर येथील मुख्य रस्ता व तामगाव - प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते बसल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी या दोन्ही रस्त्यांवर भाजीविक्रेते ठाण मांडत असल्याने या रस्त्यावरून मार्ग काढणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र बाजार कट्टा उभारण्याची मागणी होत आहे. उजळाईवाडी गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गावात भाजी विकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने विक्रेते मुख्य रस्त्याकडेलाच भाजी विक्रीसाठी बसत आहेत. त्यात ग्राहकही रस्त्याकडेलाच वाहन लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र बाजारकट्टा उभारण्याची मागणी होत आहे.
कोट : उजळाईवाडी-तामगाव रस्त्यावरील दुतर्फा असलेली भाजी मंडई बंद करून भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. रस्त्यावरील भाजी मंडई स्थलांतर करण्यात यावी.
अजित देसाई,
सामाजिक कार्यकर्ते
फोटो
१३ उजळाईवाडी भाजीमंडई
ओळ : उजळाईवाडीत रस्त्याच्या दुतर्फा भाजी मंडई भरत असल्याने वाहतूक कोंडी होते.