शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लालभडक टोमॅटो दोन रुपयांवर, ऐन श्रावणात भाजीपाला घसरला : मेथी दहा रुपयांना तीन पेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:42 AM

ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.

ठळक मुद्देलालभडक टोमॅटो दोन रुपयांवर, ऐन श्रावणात भाजीपाला घसरला मेथी दहा रुपयांना तीन पेंढ्या

कोल्हापूर : ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे.

मेथीची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. किरकोळ बाजारात दहा रुपयांना मेथीच्या तीन पेंढ्यांची विक्री सुरू आहे. या तुलनेत फळबाजार स्थिर आहे. कडधान्य बाजारामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत फारशी चढउतार दिसत नाही.श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढते आणि दर भडकतात. त्यात यंदा पाऊस जास्त असल्याने आवक कमी होऊन भाज्यांची चणचण भासेल, असा अंदाज होता; पण ऐन श्रावणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. घाऊक बाजारात कोबीचा दर सरासरी चार रुपये किलो राहिला आहे. वांगी, ढब्बू, घेवड्याचा दर २० रुपये किलोपर्यंत खाली आला आहे.

गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी व वरणा ४० रुपये किलो आहे. टोमॅटोचा दर सगळ्यांत खाली आला आहे. घाऊक बाजारात दर सरासरी साडेसहा रुपये किलो असला तरी बहुतांश टोमॅटो दोन रुपये किलोनेच जातो. कोथिंबिरीची आवक स्थिर आहे. पाच ते सात रुपये पेंढी आहे.

मेथीची रोज २५ हजार पेंढीपेक्षा अधिक आवक सुरू असल्याने दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात दहा रुपयांना तीन पेंढ्या विक्री आहे. कांदापात, शेपू, पालक या पालेभाज्यांना मागणी चांगली असली तरी दरात चढउतार नाही.

फळमार्केटमध्ये डाळींब, सीताफळ, पेरू, पपईची रेलचेल सुरू आहे. सफरचंदची आवकही चांगली असून दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. डाळींब ३० रुपये किलो आहे. कडधान्य मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. तूरडाळ, हरभराडाळ, मटकी, मुगाचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत. कांदा व बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा फरक पडलेला नाही.

मोरावळ्याची आवक वाढलीशहरातील मंडईत मोरावळ्याची आवक सुरू झाली आहे; पण त्याचा अपेक्षित उठाव दिसत नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.‘घटप्रभा’ची आवक जोरातकोल्हापूर बाजार समितीत सांगली, कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण अलीकडे ‘घटप्रभा’ येथून भाजीपाला कोल्हापुरात येऊ लागला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर