शहरं
Join us  
Trending Stories
1
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
2
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
3
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
4
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
5
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
6
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
7
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
8
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
9
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
10
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
12
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
13
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
14
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
15
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
16
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
17
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
18
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
19
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
20
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी वाहनधारकांचे हेलपाटे, ३० एप्रिलपर्यंत मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:23 IST

वाहनधारकांना नंबरप्लेट आल्याचे ‘एसएमएस’ येतात. मात्र, नंबरप्लेट उपलब्ध नसल्याचा अनुभव 

कोल्हापूर : राज्य सरकारने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बंधनकारक केली. मात्र, जिल्ह्यात ही नंबरप्लेट बसविण्यासाठी सुरू असलेल्या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजले आहेत. वाहनधारकांना नंबरप्लेट आल्याचे ‘एसएमएस’ येतात. मात्र, नंबरप्लेट उपलब्ध नसल्याचा अनुभव येत असल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदत दिली आहे.

ही नंबरप्लेट वाहनधारकांनी बसविली नसल्यास पाच हजारांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालय करणार आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ आणि तारीख निवडत आहेत. त्यासाठी दुचाकीसाठी ४५०, तीनचाकीसाठी ५०० आणि इतर सर्व वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारणी केली जात आहे.जिल्ह्यातील २९ डिलर्सना अधिकृत फिटनेस सेंटर म्हणून मान्यता दिली असून येथे नंबरप्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक वाहनधारकांना तुमची नंबरप्लेट आल्याचा ‘एसएमएस’ मोबाइलवर येत आहे. त्यानुसार फिटनेस सेंटरमध्ये गेल्यानंतर अद्याप तुमची नंबरप्लेट आली नसल्याचे वाहनधारकांना सांगितले जात आहे.

नंबरप्लेट उपलब्ध नाहीवाहन चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि बनावट नंबरप्लेट्सचा वापर रोखण्यासाठी ही प्रणाली लागू केली जात आहे. अद्याप जिल्ह्यात ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटच्या प्रतीक्षेत सुमारे ७ लाखांहून अधिक वाहने आहेत. मात्र, त्या तुलनेत फिटनेस सेंटरकडे पुरेसा कर्मचारीवर्ग आणि नंबरप्लेटची उपलब्धता नाही. त्यामुळे अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजले आहेत.

नंबरप्लेटचे उत्पादननिगडेवाडी (ता. करवीर) परिसरातील एका कारखान्यात हाय सिक्युरिटी नंबरप्लेट तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, जितकी वाहनधारकांची मागणी आहे, तितक्या प्रमाणात या नंबरप्लेट उपलब्ध होत नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

नंबरप्लेट आल्याचा ‘एसएमएस’ आला. त्यानुसार उद्यमनगरातील एका फिटनेस सेंटरवर गेलो असता तुमच्या वाहनाची नंबरप्लेट आली नसल्याचे सांगितले. असा दोनवेळा प्रकार अनुभवला. त्यामुळे नंबरप्लेट उत्पादित करणारी कंपनी आणि फिटनेस सेंटरमध्ये सावळा गोंधळ असून, वाहनधारकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. - अतुल देसाई, वाहनधारक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर