- अमर मगदूम
राशिवडे : ऊस कारखानदारीतील काटा मारीच्या विरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पूणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर पुकारलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना आणेवाडी टोल नाक्यावर टोल साठी अडवल्याने सुमारे अर्धातास वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमुळे आणेवाडी सातारा टोल नाक्यावर वाहणांच्या रांगा लागल्या होत्या.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार कोणत्याच टोल नाक्यावर टोल आकारण्यात आला नव्हता. मात्र आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेच्या वाहणांना अडवून धरल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण वाहतूक रोखून धरली. त्यामुळे सुमारे पाच कीलोमीटर वाहणांच्या रांगा लागल्या. दरम्यान टोल प्रशासनाने प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांच्याशी चर्चा करून नरमाईची भुमिका घेत संघटनेच्या वाहणांना सोडण्यात आले.