शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कोल्हापूरात ध्वनियंत्रणेसह वाहने जप्त, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई : मालक, वाहनचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 1:46 PM

गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देकोल्हापूरात ध्वनियंत्रणेसह वाहने जप्त, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई : मालक, वाहनचालकांना अटक

कोल्हापूर : गणेश आगमनासाठी ध्वनियंत्रणा घेऊन जाणाऱ्या ध्वनियंत्रणेचे मालक, वाहनचालक यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह राजारामपुरी, करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अटक केली. त्यांच्याकडून ध्वनियंत्रणेसह बस, वाहने असा सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.याप्रकरणी संशयित ध्वनियंत्रणेचे मालक प्रदीप शिवाजी गायकवाड (रा. वर्षानगर, कोल्हापूर) व टेम्पोचालक सर्जेराव बळवंत पाटील (रा. निगवे खालसा, ता. करवीर) आणि सुजित कृष्णा कारंडे यांना अटक केली.

पोलिसांनी ध्वनियंत्रणा व बेसवर गुरुवारी कारवाई करून ती जप्त केली.पोलिसांनी सांगितले की, ध्वनियंत्रणेवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथक स्थापन केले. त्यानुसार गुरुवारी आयसोलेशन हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून टेम्पोचालक सर्जेराव पाटील हा ध्वनियंत्रणा घेऊन जात होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित यांनी त्याला पकडले. त्याच्या ताब्यातील चार बेस टॉप, मिक्सर, वायर केबल, ताडपदरी व टेम्पो जप्त केला.

करवीर पोलीस गुरुवारी ध्वनियंत्रणा नेत असताना. 

याप्रकरणी पाटील व ध्वनियंत्रणेचे मालक प्रदीप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ (१) आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस नाईक रणजित कांबळे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली आहे.याचप्रमाणे ध्वनियंत्रणा नेत असताना संशयित टेम्पोचालक सुजित कृष्णा कारंडे याला पकडले. त्याच्याकडील चार बेस, तीन टॉप जप्त केले. याचबरोबर जुना राजवाडा व करवीर पोलीस ठाणे अंतर्गत अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. करवीर पोलिसांनी ध्वनियंत्रणा व बस असे सुमारे तीन लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

श्री ग्रुपबॉईज अध्यक्षांसह आठ जणांवर गुन्हा; पाच लाखांची ध्वनियंत्रणा जप्तबुधवारी (दि. १२) रात्री रामानंदनगर - पोवार कॉलनी येथील श्री ग्रुप बॉईज मंडळाची गणेशमूर्ती आणताना ट्रॅक्टर-ट्रॉलीवर ध्वनियंत्रणा लावली होती. याप्रकरणी करवीर पोलिसांनी चार लाख ८५ हजार रुपयांचे ध्वनियंत्रणेचे साहित्य जप्त केले.याप्रकरणी मंडळाचा अध्यक्ष संशयित प्रसाद रघुनाथ हांडे, उपाध्यक्ष ओंकार बाळू पाटील, खजानिस सौरभ कांबळे, सचिव तुषार पाटील (सर्व रा. रामानंदनगर, कोल्हापूर), ध्वनियंत्रणाचा मालक अभिजित दिलीप माने (रा. कदम गल्ली, उचगाव), आॅपरेटर अविराज जाधव, ट्रॅक्टरचालक बसू आण्णाप्पा शिंत्रे (रा. सौंदत्ती, बेळगाव) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सहायक फौजदार रमेश ठाणेकर, सुहास पाटील, किरण वावरे, दीपक घोरपडे, सागर कांडगावे, नंदगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस