कोल्हापूर : तेरावी जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स कार्टिंग स्पर्धेच्या चौथ्या फेरीचे आयोजन केल्याची माहिती मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते व जे. के. टायर्सचे अकबर इब्राहिम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्टिंगचा थरार हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या सर्किट ०९ ट्रकवर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या चौथ्या फेरीतील मुख्य रेस होणार आहेत. त्यात जगभरातील ४० नामवंत रेसिंगपटू सहभागी होणार आहेत. त्यात कोल्हापूरचे चित्तेश मंडोडी, धु्रव मोहिते, कृष्णराज महाडिक (युरो जेके १६ कॅटगरी) आणि प्रद्युम्न दानीगौंड यांचाही सहभाग असणार आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या रेसिंग ट्रॅकवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गो-कार्टिंग रेस होत आहेत. यंदा जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय मॅक्स स्पर्धेतील चौथ्या फेरीतील स्पर्धा या ठिकाणी होत आहे. त्यात ८ ते १२ वयोगट व १२ ते १५ वयोगटांतील रेसिंगपटू सहभागी होत आहेत. स्पर्धा सिनिअर मॅक्स, ज्युनिअर मॅक्स, मायक्रो मॅक्स या गटांत होत आहेत. यापूर्वीच्या फेऱ्या अनुक्रमे बंगलोर, हैदराबाद, कोईमतूर आणि आता कोल्हापूर येथे होत आहे. पाचवी व अंतिम फेरी दिल्ली (नोएडा) येथील बुद्ध सर्किट ट्रॅकवर होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे रेसिंगपटू परदेशी बनावटीच्या कार्टिंग कार घेऊन सहभागी होणार आहेत. स्पर्धेवर मोटर्स स्पोर्टस् आॅफ इंडिया फेडरेशनचे नियंत्रण असणार आहे. त्यानुसार सर्व तयारी या ट्रॅकवर झाली आहे. स्पर्धेची सुरुवात शनिवारी पात्रता फेरीने होणार असून मुख्य स्पर्धा रविवारी सकाळी होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)५५ गुण मिळविणारा ठरणार ‘अव्वल’स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना चार लॅप्स अर्थात १.४ किलोमीटरच्या चार फेऱ्या माराव्या लागणार आहेत. स्पर्धेत स्पर्धकाला एकूण २२ फेऱ्या माराव्या लागणार आहेत. वेळ व चालकाचे कौशल्य या स्पर्धेत बघितले जाते, तर स्पर्धेत ५५ गुण मिळविणारा रेसिंगपटू अव्वल ठरणार आहे.
कोल्हापुरात रंगणार वेगाचा थरार
By admin | Published: August 20, 2016 12:47 AM