शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचरमुळे पर्यटनवाढीला चालना : चंद्रकांत पाटील-जेऊर येथे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:26 AM

देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते जेऊर येथील व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या उद्घाटनप्रसंगी बोलत ...

ठळक मुद्देस्थानिकांना रोजगार; विद्यार्थ्यांना सवलत

देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते जेऊर येथील व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

मसाई पठाराच्या पायथ्याशी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून जिऊर ग्रामपंचायत, वनविभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती, जिऊर यांच्यावतीने उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

मंत्री पाटील म्हणाले, पर्यटकांना या पार्ककडे येणे जाणे सुलभ व्हावे म्हणून या भागातील रस्ते दुरुस्त करणार आहे. अत्यावश्यक सर्व सुविधा व निधी पुरविणार आहे. या पार्कच्या प्रसिद्धीच्या उद्देशाने हिवाळी व उन्हाळी सुट्टीत या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीत पास सुविधा उपलब्ध केली आहे. पासधारक विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश दिला जाईल. शेतकºयांनी पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून न राहता कुक्कुटपालन, शेळीपालन या संकल्पना स्वीकाराव्यात. पर्यटनवाढीसाठी आडवाटेवरील कोल्हापूर, राधानगरी येथील काजवा महोत्सवसारख्या उपक्रमातून स्थानिक लोकांना फायदा व्हावा, या उद्देशाने हा पार्क उभारला आहे.

स्थानिकांना रोजगार मिळाल्याने त्यांचे शहराकडे रोजगारासाठी येणारे लोंढे थांबतील. ग्रामीण भागही स्वयंपूर्ण होईल. स्वागत उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी केले. प्रास्ताविक सरपंच प्रियांका महाडिक यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, प्रभारी तहसीलदार अनंत गुरव, के.डी.सी.सी.चे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, पंचायत समिती सदस्य अनिल कंदूरकर, सचिन सिपुगडे, बाळासो खांडेकर, केदार उरुणकर, विलास पोवार, उत्तम कंदूरकर, वंदना पोरे, वनविभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.आमदार, खासदार यांची दांडीजिल्ह्यातील पहिला नावीन्यपूर्ण असलेल्या या अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या उद्घाटन कार्यक्रमास पन्हाळा-शाहूवाडीसह सर्व जिल्ह्यातील आमदार, खासदार अनुपस्थित राहिले. लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा उपस्थितांत चालू होती.जेऊर येथे शनिवारी व्हर्टिकल अ‍ॅडव्हेंचर पार्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रियंका महाडिक, अनिल कंदुरकर, माधुरी साळोखे, वनविभाग अधिकारी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलforest departmentवनविभाग