शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:15 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआडसांस्कृतिक विभागाच्या पुरस्कारा"ने सन्मानित

इचलकरंजी/कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रुईमधील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रभर त्याकाळी नाटकाचे दौरे केले होते. त्याकाळी गाजलेल्या नर्तकी या त्यांच्या नाटकाचे ३०० हून अधिक प्रयोग झाले होते.कालांतराने मराठी चित्रपटांमध्ये चरित्र्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीला वेगळं व्हायचय मला,मुंबईची माणसं,प्रेम तुझा रंग कसा,अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या.त्यानंतर बाई मी भोळी,कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज,सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार, धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राज्याचे राज्य येऊ दे,अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

यशवंत भालकर दिग्दर्शित हायकमांड या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. आपली सम्पूर्ण ह्यात चित्रपट, नाटक या क्षेत्रात घालवल्यामुळे अखेरच्या काळात चित्रपट मिळत नसल्याने त्या निराश झाल्या होत्या.  धनगरवाडा हा त्यांनी शेवटचा चित्रपट केला होता. तसेच अमृतवेल आणि तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्येही काम केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सलाम म्हणुन भालकर्स कला अकादमीने २०१५ मध्ये त्यांना " चिञसेवा पुरस्कारा"ने सन्मानित केले होते.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,  जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, निनाद काळे, मिलिंद अष्टेकर, राजू राऊत, संग्राम भालकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मराठी चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकार करण्याऱ्या जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर (आत्या) रा.रुई यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. सरोजताई यांना पहिल्या पासूनच अभिनयाची अत्यंत आवड  होती. अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अश्या जेंष्ठ अभिनेत्री सरोजताई सुखटणकर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फ भावपूर्ण श्रद्धांजली.- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष,पदाधिकारी, संचालक आणि सेवकवर्गअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

प्रत्येक प्रयोगाआधी मेकप झाल्यावर संपूर्णपणे कॅरेक्टरमय होऊन आपल्या प्रवेशासाठी सज्ज असलेल्या सरोजबाईंना याचि देही याचि डोळा पाहण्याचं..अनुभवण्याचं भाग्य मला मिळालं.. आमच्यासाठी हेच खरं ॲक्टींग स्कूल होतं."तुमच्यामध्ये मला कायम अरुण सरनाईकांचा भास होतो" असं मला म्हणायच्या. मघाशी फोनवरून सांगितलं की तुम्ही आज गेलात.सरोजबाई,माझ्यातून तुम्ही जाणं कधीतरी शक्य आहे का हो?- निनाद काळे, अभिनेता .

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर