काही ग्रामसेवक चंदगडला मीटिंगचे कारण पुढे करून ग्रामपंचायतीमध्ये हजर नसतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही अंकुश ठेवावा, अशी मागणी बबनराव देसाई यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवी ते बारावीचे वर्ग सुरू असून इतर वर्गांचे ऑनलाईन व ऑफलाईन वर्ग सुरू आहेत. एनएमएमएस परीक्षेत तालुक्यातून १०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी दिली. १५ व्या वित्त आयोगातून बंधीत निधी ८० लाख ४१ हजार ८१७ तर अबंधीत निधीतून ८४ लाख ८६ हजार ०९२ इतका निधी मंजूर झाला असून तो सर्व सदस्यांमध्ये समान वाटप करणार असल्याचे चंदगडकर यांनी सांगितले. या वेळी अभिंयता एस. एस. सावळगी, अभियंता देशपांडे, आरोग्य अधिकारी आर. के. खोत वनक्षेत्रपाल एस. जे. नागवेकर यांनीही आपापल्या खात्याची माहिती दिली. सभेला उपसभापती मनीषा शिवनगेकर, सदस्य विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील, रूपा खांडेकर उपस्थित होत्या. बबनराव देसाई यांनी आभार मानले.
कंपाऊंडरांच्या भरवशावर पशुवैद्यकीय दवाखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:29 AM