विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या डॉ. पाटील यांनी सातवे प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. या पदावरील नियुक्तीसाठी आठजण इच्छुक होते. त्यातील तीनजणांची नावे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या महिन्यात कुलपतींना पाठविली होती. त्यानंतर गुरुवारी या पदावर डॉ. पाटील यांची नियुक्ती झाल्याची माहिती कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठाला कळविण्यात आली. डॉ. पाटील यांचे मूळ गाव दुंडगे (ता.चंदगड) आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी. केली. त्यानंतर विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना अध्यापन, संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कार्यकाळाइतका डॉ. पाटील यांचा प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाळ असणार आहे.
प्रतिक्रिया
शिवाजी विद्यापीठात गेली ३० वर्षे मी कार्यरत आहे. संशोधनात विद्यापीठाला गती मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यात यशस्वी झालो. गेली पाच वर्षे अधिष्ठातापदी काम केल्याने मला प्रशासनाचा अनुभव आहे. प्र-कुलगुरूपदाच्या माध्यमातून विद्यापीठात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापन प्रणाली आणि विशेषतः संशोधन विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील.
-डॉ. पी. एस. पाटील
फोटो (१०१२२०२०-कोल-पी एस पाटील (युनिर्व्हेसिटी)
फोटो (१०१२२०२०-कोल-पी एस पाटील (युनिर्व्हेसिटी) ०१ : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची गुरुवारी नियुक्ती झाली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते.