कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील लेटकमर्स (कामावर उशिरा येणारे) ना आज, शुक्रवारी दणका बसला आहे. सकाळी दहा वाजता स्वत: उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी उपस्थित राहून कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्यांना पकडले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. दिवसभर कार्यालयात लेटकमर्सचीच चर्चा सुरू होती.जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी दहा वाजून दहा ते सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटे अशी आहे. मात्र, अनेक कर्मचारी साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे नेहमी उशिरा येतात आणि लवकर जात असतात, हे जगजाहीर आहे. जिल्ह्यातून आलेल्या लोकांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत थांबावे लागते. काही कर्मचारी सातत्याने उशिरा येतात, याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे, लोकांना त्रास होत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर उपाध्यक्ष खोत यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. यानुसार आज कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर असतात की नाही, वेळेत कोण-कोण येते याची माहिती घेण्यासाठी सदस्य खोत सकाळी दहा वाजता कार्यालयासमोर येऊन थांबले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या सुमारे ३६५ पैकी ११५ कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले आहे. उशिरा आलेल्यांची हजेरीपत्रकावर सही घेऊ नये, अशी सूचना श्री. खोत यांनी प्रशासनाला दिली आहे. (प्रतिनिधी)निषेध आणि शंखध्वनीलेटकमर्सनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप केला. त्यांनी माफी मागावी, अशीही मागणी लावून धरली. त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत शंखध्वनी करत कार्यालयातच ठिय्या मारला. सीईओ सुभेदार यांनी लेटकमर्सची भेट घेऊन समझोता करण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी सीईओ यांच्या कक्षातही बैठक घेण्यात आली.उशिरा आलेले कर्मचारीविभागएकूणलेटकमर्सवित्त३७१८सर्वशिक्षा अभियान१३६बांधकाम३९११ग्रामपंचायत पाणीपुरवठा२१८ग्रामपंचायत२२३महिला बालकल्याण४२समाजकल्याण१२२ एकात्मिक बाल विकास५२शिक्षण (प्राथमिक)६७२०जिल्हा ग्रामीण विकास२७१०कृृषी१६७शिक्षण (माध्यमिक)३४१०आरोग्य५४१३आरोग्य (प्रतिनियुक्ती)७२पशुसंवर्धन७ १एकूण३६५११५प्रशासनाला शिस्त लागावी, यासाठी सकाळी दहा वाजता मी येऊन थांबलो. एकूण ३६५ पैकी ११५ कर्मचाऱ्यांची हजेरीपत्रकावर सही नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेपेक्षा ११५ कर्मचारी उशिरा आल्याचे स्पष्ट झाले आहे. - शशिकांत खोत (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद)’’कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आलेल्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर नियमाप्रमाणे कारवाई होईल. आज हजेरीपत्रकावर सही नसलेल्या ११५ मधील काही जणांची रजा असेल. त्यामुळे नेमके कितीजण उशिरा आले, हे मला सांगता येणार नाही. - सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासनलेट कमर्सनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन केले. यावेळी सीईओ अविनाश सुभेदार यांनी लेट कमर्सची भेट घेतली.
उपाध्यक्षांचा लेटकमर्सना दणका
By admin | Published: November 22, 2014 12:31 AM