- किटवडेत १० तासात १९२ मि. मी. पाऊस
आजरा : आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाची मच्छिंद्री गुरुवारी सायंकाळी झाली आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी कोल्हापूर, गडहिंग्लज, गोवा व कोकणातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिरण्यकेशी नदीचे पाणी सायंकाळी रामतीर्थवरील राम मंदिरात शिरले आहे. किटवडे परिसरात १० तासांत १९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
रामतीर्थ धबधबा व पुराचे पाणी पाहण्यासाठी सायंकाळी व्हिक्टोरिया पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने पुलाची मच्छिंद्री झाली असून पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून सुरू होते.
सेन्सर बंदच
हिरण्यकेशी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यानंतर व्हिक्टोरिया पुलावर बसविण्यात आलेला सेन्सर चालू होऊन तांबडा दिवा लागत होता. मात्र, गेले दोन वर्षे याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज व्हिक्टोरिया पुलाची मच्छिंद्री झाल्यानंतरही हा तांबडा दिवा लागलाच नाही.
--
फोटो ओळी : मुसळधार पडणाऱ्या पावसाने आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाची झालेली मच्छिंद्री. (सदाशिव मोरे)
क्रमांक : २२०७२०२१-गड-१२
फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील धुवाधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीला पूर आला असून जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नदीचे हे विहंगम दृश्य. (दर्पण फोटो, कोवाड)
क्रमांक : २२०७२०२१-गड-११