शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

‘कोल्हापूर पोलिस’चा दणदणीत विजय

By admin | Published: January 04, 2017 12:34 AM

केएसए चषक फुटबॉल : ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’वर ७-० ने मात

कोल्हापूर : आक्रमक खेळाच्या जोरावर ‘केएसए’ चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाने गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशनवर ७-० अशा गोलने मंगळवारी मात केली. धडाकेबाज खेळ करीत ‘कोल्हापूर पोलिस’च्या अक्षय व्हरांबळे याने गोलची हॅट्ट्रिक केली. येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. यातील अंतिम ७ व्या फेरीतील दुसरा सामना मंगळवारी कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ आणि गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशन यांच्यात झाला. यात सुरुवातीपासून ‘कोल्हापूर पोलिस’ने आक्रमक खेळ केला. त्यांच्या गणेश दाते याने सामन्याच्या २० व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाचे खाते उघडले. यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला आणि ३३ व्या मिनिटाला युक्ती ठोंबरेच्या पासवर सोमनाथ लांबोरे याने चेंडूला गोल जाळीची दिशा दाखवून संघाच्या खात्यात दोन गोलची भर घातली. पूर्वार्धात ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’च्या गोलक्षेत्रात चेंडू फिरता राहिला. त्यांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंकडून काही सोप्या संधी वाया गेल्या. अखेर पूर्वार्धात ‘कोल्हापूर पोलिस’ ३-० अशा गोलने आघाडीवर राहिले. उत्तरार्धात ‘कोल्हापूर पोलिस’ने आक्रमक पवित्रा घेत खेळ सुरू केला. त्यांच्यासमोर ‘गोल्ड स्टार स्पोर्टस्’च्या बचावफळीचा टिकाव लागला नाही. यात ‘कोल्हापूर पोलिस’च्या युवराज गोडसेच्या पासवर युक्ती ठोंबरे याने सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला गोल करून संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर संघाची विजयाकडील घोडदौड कायम राहिली. यात अक्षय व्हरांबळे याने सामन्याच्या ७६, ७८ व्या मिनिटाला आणि जादा वेळेत मैदानी गोल करून बाजी मारली. समन्वयातील अभावामुळे ‘गोल्ड स्टार’ला एकाही गोलची परतफेड करता आली नाही. त्यांच्या सोमनाथ चौगुले, अवधूत गुरव, शिवतेज पाटील, रविराज भोसले, निखिल साळोखे, आदींच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर ‘कोल्हापूर पोलिस’ संघाने ७-० अशा गोलने विजय मिळविला. सोमनाथ लांबोरे, युवराज गोडसे, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, आदींनी चांगला खेळ केला. या विजयी संघाने स्पर्धेतील ७ व्या फेरीअखेर एकूण १० गुणांची कमाई केली. (प्रतिनिधी)कोल्हापुरात मंगळवारी ‘केएसए’ चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ व गोल्ड स्टार स्पोर्टस् असोसिएशन यांच्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.