शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

Kolhapur News: ‘कुंभी’त सत्तेचा चौथ्यांदा ‘चंद्रदीप’, सर्व २३ जागांवर दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:49 AM

दुसऱ्या फेरीत नरकेंची जोरदार मुसंडी

प्रकाश पाटील/मच्छिंद्र मगदूमकोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी विजयाचा चौकार ठोकला. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सलग चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवत ‘कुंभी’च्या राजकारणावरील आपली पकड घट्ट असल्याचे विरोधकांना त्यांनी दाखवून दिले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत चिवट झुंज दिली, परंतु त्यांना पराभवाला सामाेरे जावे लागले.नरके यांच्या ताब्यातील साखर कारखाना काढून घ्यायचाच म्हणून आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके व चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केल्याने या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होेते. परंतु, सभासदांनी नरके घराण्याकडेच कारखाना सुरक्षित राहू शकेल, या भावनेने मतदान केल्याने एवढ्या अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली. चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली. ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी गेला महिनाभर केलेल्या पडद्यामागील जोडण्याही यशाला कारणीभूत ठरल्या.‘कुंभी’साठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गेले पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात ३५ टेबलांवर मोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत विरोधी शाहू आघाडीने आघाडी घेतली होती.

मात्र, दुसऱ्या फेरीत नरके पॅनलने जोरदार मुसंडी मारत ‘शाहू’ आघाडीचे मताधिक्य कमी करीत, त्यांच्यावर सरासरी ४०० ते ५०० चे मताधिक्य राखत पन्हाळा तालुक्यात प्रवेश केला. तिसऱ्या फेरीतही नरके पॅनलने मताधिक्य कायम ठेवले. निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.चंद्रदीप नरकेंची पकडस्वर्गीय डी. सी. नरके यांच्या निधनानंतर चंद्रदीप नरके यांनी २००४, २००९, २०१५ व २०२३ अशा चारही निवडणुकीत एकतर्फी सत्ता ताब्यात ठेवली. यावरून त्यांची ‘कुंभी’च्या राजकारणावरील पकड किती घट्ट आहे, हे लक्षात येते.

राजेंद्र सूर्यवंशी यांची शेवटपर्यंत झुंजदुसऱ्या फेरीअखेर नरके पॅनलने मुसंडी मारली असली तरी विरोधी आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी गट क्रमांक २ मध्ये मताधिक्य कायम राखले होते. कार्यक्षेत्रातील त्यांचा संपर्क व कोरोना काळातील काम सभासदांनी लक्षात ठेवल्याने सूर्यवंशी यांनी चांगली मते घेतली. यामुळे नरके पॅनलचे सर्जेराव हुजरे हे अडचणीत आले होते. मात्र, तिसऱ्या फेरीत त्यांचे मताधिक्य कमी होत जाऊन हुजरे यांना गुलाल लागला.मतमोजणी यंत्रणेवर ताणसकाळी सातपासून कर्मचारी मतमोजणीच्या कामात होते. रात्री उशिरापर्यंत मोजणीचे काम सुरू राहिल्याने कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण जाणवत होता. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक प्रदीप मालगावे यांनी नेटके नियोजन केल्याने विनातक्रार मोजणीची प्रक्रिया पार पडली.नऊ तासांनंतर पहिली फेरी पूर्णपहिली फेरी पूर्ण होण्यास तब्बल नऊ तास लागले. नऊ मतपत्रिका आणि क्रॉस व्होटिंगमुळे मोजणीला विलंब लागत होता. त्यानंतर मात्र दुसरी व तिसरी फेरी गतीने पूर्ण झाली.पहिल्या फेरीत ‘शाहू’ आघाडी पुढेपहिल्या फेरीत कुडित्रे, वाकरे, काेपार्डे, कळंबे तर्फ ठाणे, भामटे, चिंचवडे, सांगरुळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला या गावांतील मोजणी करण्यात आली. यामध्ये विरोधी शाहू आघाडीचे २१ उमेदवार आघाडीवर राहिले. सत्तारूढ आघाडीचे चंद्रदीप नरके व कृष्णात कांबळे यांनी आघाडी घेतली.दुसऱ्या फेरीत नरकेंची जोरदार मुसंडीदुसऱ्या फेरीत चाफोडी, आरळे, घानवडे, महे, कोगे, खुपीरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, दोनवडे, शिंगणापूर, पाडळी खुर्द, यवलूज, माजगाव, आळवे, पुनाळ या गावांतील मोजणी करण्यात आली. यामध्ये नरके पॅनलने जोरदार मुसंडी घेत विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली.रात्री अकरानंतरच गुलालमतमोजणीला विलंब होत असल्याने निकालाबाबत लवकर अंदाज येत नव्हता. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे मंगळवारी दिवसभर फोन खणखणत होते. रात्री अकरानंतर विजयाचा अंदाज आल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक