त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दीपोत्सव
आदित्य वेल्हाळ, ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १४- ५१ हजार पणत्या प्रज्वलित, पुरातन मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य आतषबाजी आणि फटाके, लेसर शो, मनमोहक रांगोळ्या आणि रसिक रंजन वाद्यवृंद भावगीतांच्या मंगलमय व थंडीच्या वातावरणात सोमवारी पहाटे कोल्हापूरातील पंचगंगा नदीघाट परिसर पणत्यांनी उजळून निघाला होता.
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती,भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव आदींच्या उपस्थितीत दीपोत्सव सुरु झाला.
दरवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पोर्णिमे निमित्त पंचगंगा नदी घाटसह महादेव मंदिर, रावणेश्वर मंदिर, कुणकेश्वर मंदिरावर पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी आकर्षक व नेत्रदीपक विद्युत रोषणाई व आकर्षक कारंज्या होता. पहाटेची बोचरी थंडी आणि सेल्फी काढून या दीपोत्सवाचा आनंद लुटला.याचबरोबर भावगीत,भक्तिगीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद लुटला.यासाठी बालगोपालांसह वृद्धांनीही यावेळी गर्दी केली होती.
https://www.dailymotion.com/video/x844huk