शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

By admin | Published: September 29, 2014 12:54 AM

चौरंगी लढतीने रंगत : अनेकांना लागणार अनपेक्षित लॉटरी

विश्वास पाटील / कोल्हापूर प्रत्येक मतदारसंघातील मतदान सरासरी तीन लाखांपर्यंत आहे. निवडणुकीत चुरस असल्याने सरासरी ७५ टक्के मतदान होईल, असे गृहीत धरले तरी ज्या उमेदवारांकडे ५० हजार मतांचे पॉकेट आहे, त्याला विजयाची संधी जास्त असल्याचे चित्र विधानसभा निवडणूक १९९९ च्या आकडेवारीच्या आधारे पुढे आले आहे. बहुतांश मतदारसंघांत चौरंगी लढतीचे चित्र दिसते आहे. आतापर्यंत काहींची निवडणूक सोपी होती, ती आता मतविभागणीमुळे अवघड बनली आहे व ज्यांना एकास एक लढतीत विजयासाठी जिवाचे रान करावे लागले असते, ते आता काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत. राज्यात १९९९ ला काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला व ते विधानसभा निवडणुकीस स्वबळावर सामोरे गेले. त्यावेळी शिवसेना-भाजप युती मात्र एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेली; परंतु या निवडणुकीत मात्र दोन्ही काँगे्रसच्या वाटा वेगळ्या झाल्या; तर शिवसेना-भाजपचाही घटस्फोट झाला. मनसेही रिंगणात उतरली. काही भागांत प्रादेक्षिक पक्षांचे अस्तित्व दखल घेण्यासारखे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यातही सहानुभूतीची हवा आहे. शिवसेनाही कधी नव्हे तेवढी आक्रमक बनली. त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. विधानसभेच्या १९९९ च्या लढतीत सर्वाधिक मतदान सांगरूळमधून होऊन संपतराव पवार यांना ६८ हजार ५७६ मते मिळाली होती; तर सर्वांत कमी मतदान कोल्हापूर शहरात होऊन शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना ३५ हजार ३०५ इतकी मते मिळाली होती. सर्वांत कमी मताधिक्क्य कागलमधून हसन मुश्रीफ यांचे २ हजार ८८१ इतके होते. दीड ते दोन लाखांपर्यंत मतदारसंख्या असलेले आठ मतदारसंघ होते. आता या निवडणुकीत नव्याने मतदान करणाऱ्या व तरुण मतदारांचा भरणा जास्त आहे. या वेळी कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ३ लाख ८ हजार ४९५ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार २ लाख ६८ हजार ५८६ इचलकरंजी मतदारसंघात आहेत. रिंगणातील उमेदवारांची संख्या वाढली की उलटेसुलटे व अंदाज चुकविणारे निकाल लागू शकतात. १९९९ च्या लढतीत कोल्हापूर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुरेश साळोखे यांना अवघी ३५ हजार मते मिळाली तरी ते ७ हजार २३७ मतांनी विजयी झाले; कारण त्यावेळी काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, शेकापचे प्रा. विष्णुपंत इंगवले आणि राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्यात मतविभागणी झाली. विरोधातील चौघांच्या मतांची बेरीज ७२ हजार होते. विजयी झालेल्या उमेदवारांना सरासरी ५८ हजार मते मिळाली. आता मतदारसंख्या वाढली. त्यावेळी राज्यात पाच वर्षे शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते व त्यांच्या भ्रष्ट कारभाराने जनता वैतागली होती. आता दोन्ही काँग्रेसबद्दल, त्यातही राष्ट्रवादीबद्दल लोकांच्या मनात जास्त राग आहे. संभाव्य मतविभागणीचा विचार करता, ज्याच्याकडे किमान ५० हजार मतांचे पॉकेट आहे, तो विजयाचा भक्कम दावेदार ठरू शकेल, अशी स्थिती नव्या राजकीय समीकरणामुळे तयार झाली आहे.